Google गोपनीयता धोरणावर आपले स्‍वागत आहे

आपण जेव्‍हा Google सेवांचा वापर करता, तेव्‍हा आपल्‍या माहितीसह आपण आमच्यावर विश्वास ठेवता. आम्‍ही कोणता डेटा संकलित करतो, तो का संकलित करतो आणि आम्‍ही त्याचे काय करतो ते समजून घेण्‍यात आपली मदत करण्‍याचा या गोपनीयता धोरणाचा उद्देश आहे. हे महत्त्वाचे आहे; हे काळजीपूर्वक वाचण्‍यासाठी आपण वेळ घ्‍याल अशी आम्‍ही आशा करतो. आणि लक्षात ठेवा, आपली माहिती व्यवस्थापित करण्‍यासाठी आणि आपल्या गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्‍यासाठी माझे खाते वर आपण नियंत्रणे शोधू शकता.

गोपनीयता धोरण

उदाहरणे लपवा
उदाहरणे दर्शवा
उदाहरणे लपवा

अखेरचे सुधारित: १८ डिसेंबर २०१७ (संग्रहीत आवृत्त्या पहा) (हायपरलिंक केलेली उदाहरणे या दस्तऐवजाच्या शेवटी उपलब्ध आहेत.)

PDF आवृत्ती डाउनलोड करा

आपण आमच्या सेवा विविध प्रकारे वापरू शकता – माहिती शोधण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी, इतर लोकांशी संवाद साधण्यासाठी किंवा नवीन सामग्री तयार करण्यासाठी. आमच्‍याबरोबर माहिती शेअर केल्याने, उदाहरणार्थ एक Google खाते तयार करून, आपल्‍याला अधिक संबद्ध शोध परिणाम आणि जाहिराती दर्शविण्यासाठी, आपल्याला लोकांसह कनेक्ट करण्यात मदत करण्‍यासाठी किंवा इतरांसह शेअर करणे जलद आणि सोपे बनविण्‍यासाठी – आम्‍ही त्‍या सेवा अजून चांगल्‍या करू शकतो. जेव्हा आपण आमच्या सेवा वापरता, तेव्हा आम्ही आपली माहिती कशी वापरत आहोत आणि आपण आपल्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करू शकता हे आम्ही आपल्याला स्पष्ट करून देऊ इच्छितो.

आमचे गोपनीयता धोरण हे स्‍पष्‍ट करते:

 • आम्‍ही कोणती माहिती एकत्रित करतो आणि ती का एकत्रित करतो.
 • आम्ही ती माहिती कशी वापरतो.
 • माहिती कशी वापरावी आणि ती अद्यावत कशी करावी यासह आम्ही देत असलेले विकल्प.

आम्‍ही हे शक्‍य तितके सोपे ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे, परंतु आपण कुकीज, IP पत्ते, पिक्‍सेल टॅग आणि ब्राउझर, यासारख्‍या शब्दांशी परिचित नसल्‍यास प्रथम या मुख्य शब्दांबद्दल वाचा. Google साठी आपली गोपनीयता महत्‍वाची आहे म्‍हणून आपण Google मध्ये नवीन असल्‍यास किंवा बर्‍याच काळापासून याचे वापरकर्ता असल्‍यास, कृपया आमच्‍या सेवा पद्धतींविषयी जाणून घेण्‍यास वेळ काढा – आणि आपल्‍याला कोणतेही प्रश्न असल्‍यास आमच्‍याशी संपर्क करा.

आम्‍ही एकत्र करीत असलेली माहिती

आपण कोणती भाषा बोलता यासारखी मूलभूत सामग्री शोधण्‍यापासून ते अधिक जटिल गोष्‍टी जसे की आपल्‍याला कोणत्या जाहिराती सर्वाधिक उपयुक्त वाटतात, आपल्‍यासाठी ऑनलाइन सर्वाधिक महत्त्वाचे असणारे लोक किंवा कोणते YouTube व्हिडिओ आपल्‍याला आवडू शकतात हे शोधण्‍यापर्यंत – आमच्या सर्व वापरकर्त्यांना चांगल्या सेवा प्रदान करण्‍यासाठी आम्‍ही माहिती संकलित करतो.

आम्ही खालील प्रकारांनी माहिती संकलित करतो:

 • आपण आम्हाला देता ती माहिती. उदाहरणार्थ, आमच्या अनेक सेवांसाठी आपण Google खात्याकरिता साइन अप करणे आवश्‍यक असते. आपण असे करताना आपल्‍या खात्यात संचयित करण्‍यासाठी आम्‍ही आपले नाव, ईमेल पत्ता, टेलिफोन नंबर किंवा क्रेडिट कार्ड यासारखी वैयक्तिक माहिती विचारू. आम्ही प्रदान करतो त्या सामायिकरण वैशिष्‍ट्यांचा आपण पूर्ण लाभ घेऊ इच्छित असल्यास, आम्ही आपल्याला सार्वजनिकरित्या दृश्‍यमान असलेले आपले नाव आणि फोटो समाविष्‍ट असणारे Google प्रोफाईल तयार करण्‍यास सांगू.

 • आपण आमच्या सेवा वापरल्यामुळे आम्हाला मिळणारी माहिती. आपण YouTube वर व्हिडिओ पाहता, आमच्या जाहिरात सेवा वापरणार्‍या एखाद्या वेबसाइटला भेट देता किंवा आपण आमच्या जाहिराती आणि सामग्री पाहता आणि संवाद साधता त्यावेळी, आम्ही आपण वापरत असलेल्या सेवेबद्दल आणि आपण ती कशी वापरता याबद्दल माहिती संकलित करू शकतो. या माहितीत हे समाविष्‍ट आहे:

  • उपकरण (डिव्हाइस) माहिती

   आम्‍ही डिव्‍हाइस-विशिष्‍ट माहिती संकलित करतो (जसे की आपला हार्डवेअर नमुना, ऑपरेटिंग प्रणाली आवृत्ती, अनन्य डिव्‍हाइस अभिज्ञापक आणि फोन नंबरसह मोबाइल नेटवर्क माहिती). Google आपले डिव्हाइस अभिज्ञापक किंवा फोन नंबर आपल्या Google खात्याशी संबद्ध करू शकते.

  • लॉग माहिती

   आपण आमच्या सेवा वापरता किंवा Google द्वारे प्रदान केलेली सामग्री पाहता तेव्‍हा, आम्‍ही स्वयंचलितपणे विशिष्‍ट माहिती सर्व्हर लॉग मध्‍ये संकलित आणि संचयित करतो. यामध्‍ये हे समाविष्‍ट होते:

   • आपण आमची सेवा कशी वापरता त्याचे तपशील, जसे की आपल्या शोध क्वेरी.
   • आपला फोन नंबर, कॉल केलेल्या पक्षाचा नंबर, अग्रेषित केलेले नंबर, कॉलचा वेळ आणि तारीख, कॉलचा कालावधी, SMS रुटींग माहिती आणि कॉलचे प्रकार यासारखी टेलिफोनविषयक लॉग माहिती.
   • इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता.
   • डिव्हाइस इव्हेंट माहिती जसे की क्रॅश होणे, सिस्टम क्रिया, हार्डवेअर सेटिंग्ज, ब्राउझर प्रकार, ब्राउझर भाषा, आपल्या विनंतीची तारीख आणि वेळ आणि निर्दिष्ट URL.
   • आपल्या ब्राउझरला किंवा आपल्या Google खात्यास अनन्यपणे ओळखू शकणार्‍या कुकीज.
  • स्थान माहिती

   आपण Google सेवा वापरता तेव्‍हा, आम्‍ही आपल्या वास्तविक स्थानाविषयी माहिती संकलित करू शकतो आणि त्यावर प्रक्रिया करू शकतो. आम्‍ही स्‍थान निर्धारित करण्‍यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर करतो ज्यात IP पत्ते, GPS, आणि अन्य सेन्सर समाविष्ट आहेत जे, उदाहरणार्थ, Google ला जवळील डिव्हाइसेस, वाय-फाय प्रवेश बिंदू आणि सेल टॉवर वरील माहिती प्रदान करू शकतात.

  • अनन्य अनुप्रयोग क्रमांक (युनिक अॅप्लिकेशन नंबर)

   काही सेवा एक वेगळा अनुप्रयोग नंबर समाविष्ट करतात. हा नंबर आणि आपल्या स्थापनेबद्दलची माहिती (उदाहरणार्थ ऑपरेटिंग सिस्टीम प्रकार आणि अनुप्रयोग आवृत्ती क्रमांक) आपण ती सेवा स्‍थापित किंवा विस्थापित केल्यावर किंवा त्या सेवेने वेळोवेळी स्वयंचलित अद्ययावत होण्सायाठी आमच्या सर्व्हरशी संपर्क साधल्यावर, Google कडे पाठविली जाऊ शकते.

  • स्थानिक संचयन

   आम्‍ही ब्राउझर वेब संग्रह (HTML 5 सह) आणि अनुप्रयोग डेटा कॅशे यासारख्‍या प्रणाल्‍यांचा वापर करून आपल्‍या डिव्‍हाइसवर स्‍थानिकरित्‍या माहिती (वैयक्तिक माहितीसह) एकत्र आणि संग्रहित करू शकतो.

  • कुकीज आणि तत्सम तंत्रज्ञान

   आपण Google सेवेला भेट देता तेव्हा आम्‍ही आणि आमचे भागीदार विविध तंत्रज्ञानांचा वापर माहिती एकत्रित आणि संचयित करण्‍यासाठी करतो आणि आपला ब्राउझर किंवा डिव्‍हाइस ओळखण्‍यासाठी यात कुकीज किंवा त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर समाविष्ट असू शकतो. आम्‍ही आमच्या भागीदारांना देऊ केलेल्‍या सेवा जसे की इतर साइटवर दिसणारी Google वैशिष्‍ट्‍ये किंवा जाहिरात सेवा यासह आपण संवाद साधता तेव्‍हा आम्‍ही माहिती संकलित आणि संचयित करण्‍यासाठी हे तंत्रज्ञान देखील वापरतो. आमचे Google Analytics उत्पादन व्यवसाय आणि साइट मालकांना त्यांच्या वेबसाइट आणि अॅप्सच्या रहदारीचे विश्लेषण करण्यात मदत करते. डबलक्लिक कुकी वापरणाऱ्या आमच्या जाहिरात सेवांसह संयुक्तपणे वापरल्यावर Google Analytics माहितीचा Google तंत्रज्ञानाचा वापर करून, Google Analytics ग्राहकाद्वारे किंवा Google द्वारे, एकाधिक साइटना दिलेल्या भेटींबद्दल माहितीशी दुवा साधला जातो.

भागीदारांकडून आपल्या विषयी मिळवलेल्या माहितीव्यतिरिक्त, आपण Google मध्ये साइन इन केलेले असते तेव्हा आम्ही गोळा केलीली माहिती, Google खात्यासह संबंद्ध असू शकते. आपल्या Google खात्यासह माहिती संबद्ध असते तेव्हा, आम्ही ती वैयक्तिक माहिती म्हणून हाताळतो. आपल्‍या Google खात्याशी संबद्ध असलेल्या माहितीमध्‍ये आपण प्रवेश कसा करू शकता, ती कशी व्यवस्थापित करू किंवा हटवू शकता याविषयी अधिक माहितीसाठी, या धोरणाच्या पारदर्शकता आणि निवड विभागास भेट द्या.

आम्ही संकलित करत असलेली माहिती आम्ही कशी वापरतो

आमच्‍या सर्व सेवांमधून संकलित केलेल्‍या माहितीचा वापर आम्‍ही त्या सेवा प्रदान करण्यासाठी, देखरेख करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी आणि त्‍यांना सुधारण्यासाठी, नवीन विकसित करण्यासाठी, आणि Google आणि आमच्‍या वापरकर्त्‍यांचे संरक्षण करण्याकरिता करतो. आम्ही आपल्याला संबंधित सामग्री प्रदान करण्यासाठी देखील ही माहिती वापरतो - जसे की अधिक संबद्ध शोध परिणाम आणि जाहिराती देण्यासाठी.

आपल्‍या Google प्रोफाइलसाठी आपण प्रदान केलेले नाव आम्‍ही देऊ करीत असलेल्‍या सर्व सेवा ज्‍यांना एका Google खात्‍याची आवश्‍यकता असते त्‍या सेवांमध्‍ये वापरू. या ‍व्यतिरिक्त, आम्ही आपल्या Google खात्याशी संबंधित जुनी नावे बदलु शकतो जेणेकरुन सर्व सेवांमध्‍ये आपल्याला सुसंगतपणे दर्शवले जाईल. आपले ईमेल इतर वापरकर्त्यांकडे आधीपासूनच असल्यास किंवा आपल्याला ओळखणारी अन्य माहिती असल्यास, आम्ही त्यांना आपली सार्वजनिकपणे दृश्यमान असलेली Google प्रोफाइल माहिती दर्शवू शकतो, जसे की आपले नाव आणि फोटो.

आपल्याकडे एक Google खाते असल्यास, आम्ही आपले प्रोफाईल नाव, प्रोफाईल फोटो आणि आपण करता त्या क्रिया Google वर किंवा जाहिरातींमध्ये आणि इतर व्यावसायिक संदर्भांमध्ये प्रदर्शित करण्यासह, आमच्या सेवांमधील आपल्‍या Google खात्याशी कनेक्ट केलेल्या तृतीय-पक्ष अनुप्रयोगांवर प्रदर्शित करू शकतो (जसे की +1, आपण लिहिता ती पुनरावलोकने आपण पोस्ट करता त्या टिप्पण्या). आपण सामायिकरण किंवा दृश्‍यमानता सेटिंग्ज मर्यादित करण्‍यासाठी आपल्‍या Google खात्यामध्‍ये करता त्या निवडींचा आम्‍ही आदर करू.

आपण Google शी संपर्क साधता तेव्‍हा, आपल्‍याला कदाचित येत असणार्‍या कोणत्याही समस्‍यांचे निराकरण करण्‍यात मदत करण्‍यासाठी आम्‍ही आपल्‍या संप्रेषणाचा रेकॉर्ड ठेवतो. आगामी बदल किंवा सुधारणांविषयी आपल्याला कळविणे, यासारख्या आमच्या सेवांविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आम्‍ही आपला ईमेल पत्ता वापरू शकतो.

आम्‍ही कुकीज आणि पिक्‍सेल टॅग सारख्‍या इतर तंत्रज्ञानांमधून संकलित केलेल्‍या माहितीचा वापर आपला वापरकर्ता अनुभव आणि आमच्‍या सेवांची एकंदर गुणवत्ता सुधारण्‍यासाठी करतो. आमच्या स्वत:च्या सेवांवर हे करण्यासाठी आम्ही वापरतो त्या उत्पादनांपैकी एक Google Analytics हे आहे. उदाहरणार्थ, आपली भाषा प्राधान्ये जतन करून, आपण प्राधान्य देता त्या भाषेमध्ये आमच्या सेवा दर्शवण्यात आम्ही सक्षम होऊ. आपल्याला उचित जाहिराती दर्शविताना, आम्ही कुकीज किंवा त्यासारख्या तंत्रज्ञानातील अभिज्ञापकास जात, धर्म, लैंगिक अभिमुखता किंवा आरोग्य यावर आधारित संवेदनशील श्रेण्यांसह संबद्ध करणार नाही.

आमची स्वयंचलित प्रणाली आपल्‍याला सानुकूलित शोध परिणाम, उचित जाहिराती आणि स्पॅम आणि मालवेयर शोध यासारखी वैयक्तिक संबद्ध उत्पादन वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी आपल्या सामग्रीचे (ईमेलसह) विश्लेषण करते.

आम्ही एका सेवेमधील खाजगी माहितीस, इतर Google सेवांमधील खाजगी माहिती असलेल्या माहितीसह एकत्रित करू शकतो – उदाहरणार्थ आपण ओळखत असलेल्या लोकांसह गोष्टी सामायिक करणे सोपे करणे. Google च्या सेवा आणि Google ने दिलेल्या जाहिराती सुधारित करण्यासाठी आपल्या खात्याच्या सेटिंग्ज वर आधारित, इतर साइट आणि अॅप्स वरील आपला क्रियाकलाप कदाचित आपल्या खाजगी माहितीशी संबद्ध केला जाऊ शकतो.

या गोपनीयता धोरणांमध्ये नमूद केलेल्या व्यतिरिक्त उद्दिष्टासाठी माहिती वापरण्यापूर्वी आपली संमती मागणार.

Google जगभरातील अनेक देशांमधील आमच्या सर्व्हरवरील खाजगी माहितीवर प्रक्रिया करते. आम्ही आपली खाजगी माहितीवर आपण राहत असलेल्या देशाबाहेरील सर्व्हरवर प्रक्रिया करू शकतो.

पारदर्शकता आणि निवड

लोकांच्या गोपनीयतेच्या धारणा भिन्न असतात. आम्ही कोणती माहिती संकलित करतो याबद्दल सुस्पष्‍ट रहाणे हे आमचे ध्येय आहे, जेणेकरुन आपल्‍याला हे कसे वापरले जाते त्य‍ाविषयी अर्थपूर्ण निवडी करता येतील. उदाहरणार्थ, आपण हे करू शकता:

 • आपण Google सेवा वापरताना आपल्या खात्यासह आपण YouTube वर पाहिलेले व्हिडिओ किंवा मागील शोध यासारखा कोणत्या प्रकारचा डेटा आपण जतन करू इच्छिता ते ठरविण्यासाठी आपल्या Google क्रियाकलाप नियंत्रणांचे पुनरावलोकन आणि अद्यतन करा. आपल्या खात्यामधून साइन आउट करताना आपण आमच्या सेवांचा वापर करता तेव्हा विशिष्ट क्रियाकलाप आपल्या डिव्हाइस वरील कुकीमध्ये किंवा त्यासारख्या तंत्रज्ञानामध्ये संचयित केला जातो किंवा नाही ते व्यवस्थापित करण्यासाठी आपण या नियंत्रणांवर भेट देखील देऊ शकता.
 • Google डॅशबोर्ड वापरुन आपल्या Google खात्याशी जोडलेली विशिष्‍ट प्रकारच्या माहितीचे पुनरावलोकन आणि नियंत्रण करणे.
 • जाहिराती सेटिंग्ज वापरून आपल्याला Google वर आणि वेबवर दर्शविलेल्या Google जाहिरातींविषयीची आपली प्राधान्ये, जसे की कोणत्या श्रेण्या आपल्या स्वारस्याच्या आहेत, हे पहा आणि संपादित करा. विशिष्ट Google जाहिरात सेवांची निवड रद्द करण्‍यासाठी आपण त्या पृष्‍ठावर भेट देखील देऊ शकता.
 • आपल्या Google खात्यासह संबद्ध प्रोफाईल इतरांना कसा दिसेल ते समायोजित करा.
 • आपल्या Google खात्याद्वारे आपण कोणासह माहिती सामायिक करता ते नियंत्रित करा.
 • आमच्या बर्‍याच सेवांवरून आपल्या Google खात्यांसह संबद्ध माहिती घ्या.
 • आपले प्रोफाईल नाव आणि प्रोफाईल फोटो जाहिरातींमध्‍ये दिसणार्‍या मित्रांनी केलेल्या शिफारशींमध्ये दिसावे किंवा दिसू नये ते निवडा.

आपण आपल्‍या ब्राउझरला आमच्‍या सेवांशी संबंधित असलेल्‍या कुकीजसह सर्व कुकीजना अवरोधित करण्‍यासाठी, किंवा आमच्‍याद्वारे कुकी सेट केली जात असताना ते सूचित करण्‍यासाठी सेट देखील करू शकता. तथापि, आपल्या कुकीज अक्षम झाल्या असल्यास आमच्या बर्‍याच सेवा योग्यरितीने कार्य करू शकत नाहीत हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, आम्ही कदाचित आपली भाषा प्राधान्ये लक्षात ठेवू शकत नाही.

आपण शेअर केलेली माहिती

आमच्या सेवांपैकी अनेक सेवा आपल्याला इतरांसोबत माहिती शेअर करण्‍यास वाव देतात. लक्षात ठेवा की आपण जा‍हीरपणे माहिती शेअर करता तेव्हा, Google सह ती शोध इंजिनांकडून अनुक्रमपात्र असेल. सामग्री शेअर करणे आणि हटविणे याबाद्दल आमच्या सेवा आपल्याला विभिन्न पर्याय देतात.

आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करणे आणि ती अद्ययावत करणे

आपण जेव्‍हा आमच्‍या सेवांचा वापर करता, तेव्‍हा आपल्‍या वैयक्तिक माहितीमध्‍ये प्रवेश प्रदान करण्‍याचे आमचे ध्‍येय असते. ती माहिती चुकीची असल्यास, जोपर्यंत आम्हाला ती माहिती कायदेशीर ठरवण्यात आलेल्या व्यवसायासाठी किंवा कायदेशीर हेतूंसाठी राहू द्यायची आहे तोपर्यंत – आम्ही आपल्याला ती त्वरित अद्ययावत करण्याचे किंवा ती हटवण्याचे मार्ग सांगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

आमच्‍या सेवांना माहितीचे चुकून किंवा दुर्भावनापूर्ण नाश होण्‍यापासून संरक्षण करता यावे अशा प्रकारे सेवांची देखरेख करण्‍याचे आमचे ध्‍येय आहे. केवळ यामुळेच, आपण आमच्या सेवांवरून माहिती हटवल्यानंतर, आम्ही आमच्या सक्रिय सर्व्हरवरून तातडीने अवशिष्ट कॉपी हटवू शकत नाही आणि आमच्या बॅक अप सिस्टमवरून माहिती काढूही शकत नाही.

आम्ही शेअर करीत असलेली माहिती

आम्ही खालील परिस्थितीपैकी एक लागू होईपर्यंत Google बाहेरील कंपनी, संस्था, व्यक्तिंसह खाजगी माहिती सामायिक करत नाही:

 • आपल्या संमतीसह

  आमच्याजवळ आपली खाजगी माहिती सामायिक करण्याची आपली संमती असल्यावरच आम्ही Google च्या बाहेरील कंपन्या, संस्था किंवा व्यक्तिंसह खाजगी माहिती सामायिक करणार. कोणतीही संवेदनशील खाजगी माहिती ला सामायिक करण्याकरिता आमच्याजवळ निवडची (opt-in) संमती होणे आवश्यक आहे.

 • डोमेन अॅडमिनीस्ट्रेटर सह

  जर आपले Google खाते आपल्यासाठी डोमेन अॅडमिनीस्ट्रेटर द्वारे (उदाहरणार्थ G Suite वापरकर्त्यांसाठी) व्यवस्थापित केले जात असेल तर आपला डोमेन अॅडमिनीस्ट्रेटर आणि पुनर्विक्रेते, ज्या आपल्या संस्थेला वापरकर्ता समर्थन देतात, यांना आपल्या Google खात्याच्या माहितीवर प्रवेश असेल (आपले ईमेल आणि इतर डेटासह). आपला डोमेन अॅडमिनीस्ट्रेटर खालील वस्तू करू शकतो:

  • आपण स्थापित करणाऱ्या अॅप्लीकेशन संबंधी सांख्यिकीप्रमाणे आपल्या खात्याशी संबंधित सांख्यिकी पहाणे.
  • आपल्या खात्याचा पासवर्ड बदलणे.
  • आपल्या खात्यावरील प्रवेश निलंबित किंवा निरस्त करणे.
  • आपल्या खात्याचा भाग म्हणून संचयित केलेल्या माहितीमध्ये प्रवेश करणे किंवा ती आपल्याकडेच ठेवणे.
  • लागू कायद्याचे, अधिनियमाचे, कायदेविषयक प्रक्रियेचे किंवा अमलबजावणीस पात्र शासकीय विनंतीचे पालन करण्यासाठी आपले खाते माहिती प्राप्त करणे.
  • माहिती किंवा गोपनीयता सेटिंग्ज हटविण्याच्या किंवा संपादित करण्याच्या आपली क्षमतेवर प्रतिबंध घालणे.

  कृपया अधिक माहितीसाठी आपल्या डोमेन अॅडमिनीस्ट्रेटरच्या गोपनीयता धोरणांचा संदर्भ घ्या.

 • बाह्य प्रक्रिया करण्यासाठी

  आम्ही आमच्याऐवजी याची प्रक्रिया करण्यासाठी आमच्या संबंधितांना किंवा इतर विश्वासू व्यवसायांना किंवा व्यक्तींना, आमच्या सूचनांवर आधारित आणि आमच्या गोपनीयता धोरणांचे आणि इतर कोणत्याही योग्य गुप्ततेच्या आणि सुरक्षिततेच्या मापदंडांचे पालन करण्याच्या मुद्यावर खाजगी माहिती प्रदान करतो.

 • कायदेशीर कारणांसाठी

  खाजगी माहितीची उपलब्धता, वापर, रक्षण, किंवा तिला जाहीर करणे खालीदिलेल्या वस्तूंसाठी सर्वसामान्यपणे आवश्यक आहे याचा आम्हास विश्वास असेल तेव्हाच आम्ही खाजगी माहिती Google च्या बाहेरील कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींसह समायिक करणार:

  • कोणताही लागू कायदा, नियमन, कायदेशीर प्रक्रिया किंवा अंमलबजावणी करण्यायोग्य शासकीय विनंतीची पूर्तता करण्यासाठी.
  • संभाव्य उल्लंघनांच्या तपासणीसह, लागू होणाऱ्या सेवा अटींची अंमलबजावणी करण्यासाठी.
  • फसवणूक, सुरक्षितता किंवा तांत्रिक समस्यांचे शोध लावण्यासाठी, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा याबाबबत कृती करण्यासाठी.
  • आवश्यकतेनुसार किंवा कायद्याने परवानगी असेल त्याप्रमाणे Google, आमचे वापरकर्ते किंवा लोकांच्या अधिकार, मालमत्ता, सुरक्षेच्या नुकसानीविरोधात संरक्षण करण्यासाठी.

वैयक्तिकरित्या न ओळखण्यायोग्य माहिती सार्वजनिकपणे आणि प्रकाशक, जाहिरातदार किंवा कनेक्ट केलेल्या साइट यासारख्या आमच्या भागीदारांसह आम्ही सामायिक करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या सेवांच्या सामान्य वापराबद्दल ट्रेन्ड दर्शवण्यासाठी माहिती सार्वजनिकपणे सामायिक करू शकतो.

Google विलीनीकरण, इतर व्यवसाय आपल्यात सामावून घेणे किंवा मालमत्ता विक्री यामधे गुंतलेली असल्यास, आम्ही कोणतीही खाजगी माहितीची गोपनीयता आणि खाजगी माहितीचे हस्तांतरण केले जाण्यापूर्वी किंवा भिन्न गोपनीयता धोरणाच्या अधीन होण्यापूर्वी प्रभावित वापरकर्त्यांना सूचना देणार.

माहिती सुरक्षा

आम्‍ही Google चे संरक्षण करण्‍यासाठी आणि आमच्‍या वापरकर्त्‍यांचे अनधिकृत वापरापासून किंवा आमच्‍याकडे असलेल्‍या माहितीचा अनधिकृत बदलांपासून, तिला जाहीर करण्‍यापासून किंवा नाश करण्‍यापासून संरक्षण करण्‍यासाठी कठोर परिश्रम करतो. विशेषत:

 • आम्‍ही आमच्‍या पुष्‍कळ सेवा SSL वापरून कूटबद्ध करतो.
 • आपण आपल्‍या Google खात्‍यामध्‍ये प्रवेश करताना आम्‍ही आपल्‍याला द्वि चरण दुहेरी सत्‍ंयापन आणि Google Chrome मध्‍ये सुरक्षित ब्राउझिंग वैशिष्ट्य देऊ करतो.
 • आम्‍ही आमच्‍या माहिती संकलनाचे, संग्रहाचे आणि प्रक्रिया पद्धतींचे, शारीरिक सुरक्षा उपायांसह सिस्‍टमचे अनधिकृत प्रवेशांपासून संरक्षण करण्‍यासाठी पुनरावलोकन करतो.
 • आम्‍ही Google कर्मचार्‍यांना, कंत्राटदारांना आणि एजंटांना ज्‍यांना आमच्‍यासाठी प्रक्रिया करण्‍यासाठी ती माहिती जाणून घेण्‍याची आवश्‍यकता असते त्‍यांना, आणि जे कराराच्‍या गुप्ततेच्या कठोर बांधिलकींच्‍या अधीन आहेत त्‍यांना वैयक्तिक माहितीमध्‍ये वापर प्रतिबंधित करतो आणि त्‍यांना शिस्‍तबद्ध ठेवतो किंवा या बांधिलक्‍यांना पूर्ण करण्‍यात अयशस्‍वी झाल्‍यास त्‍यांना निरस्‍त करतो.

हे गोपनीयता धोरण जेव्हा लागू होते

YouTube, Android डिव्हाइसेसवर Google द्वारे प्रदान केलेल्या सेवा आणि इतर साइटवर प्रदान केलेल्या सेवा (जसे की आमच्या जाहिरात सेवा) यांच्यासह Google LLC आणि त्यांच्या अनुषंगिकांद्वारे प्रदान केलेल्या सर्व सेवांवर आमचे गोपनीयता धोरण लागू होते, परंतु या गोपनीयता धोरणामध्ये अंतर्भूत होत नसलेली विभक्त गोपनीयता धोरणे असलेल्या सेवांना वगळले जाते.

आमचे गोपनीयता धोरण इतर कंपन्यांकडून किंवा व्यक्तींकडून देण्यात येणार्‍या सेवांसह आपल्याला शोध परिणामात दाखविली जाणारी उत्पादने आणि साइट, Google सेवा समाविष्‍ट करु शकणार्‍या साइटस किंवा आमच्या सेवांमधून लिंक केलेल्या इतर साइटना लागू होत नाही. आमच्या गोपनीयता धोरणांमध्‍ये आमच्या सेवांची जाहिरात करणार्‍या आणि कुकीज, पिक्सल टॅग आणि इतर तंत्रज्ञान वापरु शकणार्‍या इतर कंपन्यांच्या आणि संस्‍थांच्या माहिती पद्धतींचा समावेश होत नाही.

नियामक अधिकार्‍यांसह अनुपालन आणि सहकार्य

आम्ही आमच्या गोपनीयता धोरणांच्या आमच्‍या पालनाचे नियमितपणे पुनरावलोकन करतो. EU-US आणि Swiss-US Privacy Shield Frameworks सह, आम्ही विविध स्वनियमन फ्रेमवर्क चे देखील पालन करतो. आम्‍ही अधिकृत लिखित तक्रारी प्राप्त करतो तेव्‍हा पाठपुरावा करण्यासाठी ज्‍या व्‍यक्तीने तक्रार केली त्‍यांच्‍याशी आम्‍ही संपर्क साधू. आम्‍ही थेट आमच्‍या वापरकर्त्‍यांसह वैयक्तिक डेटाच्‍या स्‍थानांतरणाशी संबंधित ज्‍या कोणत्‍याही तक्रारींचे निराकरण करू शकत नाही, त्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी आम्‍ही स्‍थानिक डेटा संरक्षण अधिकार्‍यांच्‍या समावेशासह योग्‍य नियामक अधिकार्‍यांसह कार्य करतो.

बदल

आमचे गोपनीयता धोरण वेळोवेळी बदलू शकते. आपल्‍या स्‍पष्‍ट संमतीशिवाय आम्‍ही आपले अधिकार या गोपनीयता धोरणा अंतर्गत कमी करणार नाही. आम्‍ही या पृष्‍ठावरील कोणतेही गोपनीयता धोरण बदल पाठवू आणि बदल महत्वाचे असल्‍यास, आम्‍ही अधिक स्पष्टपणे सूचना प्रदान करू (काही सेवांसाठी, गोपनीयता धोरण बदलांच्‍या इमेल सूचना). आपल्‍या पुनरावलोकनासाठी आम्‍ही या गोपनीयता धोरणाच्‍या आधीच्‍या आवृत्‍या संग्रहामध्‍ये देखील ठेवू.

विशिष्‍ट उत्पादन पद्धती

खालील सूचनांमध्‍ये विशिष्‍ट Google उत्पादनांच्या बाबतीत विविक्षीत गोपनीयता पद्धतींचे विश्लेषण केले आहे जी उत्पादने आणि सेवा आपण वापरु शकता:

आमच्या सर्वाधिक लोकप्रिय सेवांपैकी काहींविषयी अधिक माहितीसाठी आपण Google उत्पादन गोपनीयता मार्गदर्शिका ला भेट देऊ शकता.

अधिक उपयुक्त गोपनीयता आणि सुरक्षितता संबंधित सामग्री Google च्या धोरणे आणि तत्त्वे पृष्ठे द्वारे शोधली जाऊ शकतात, यासह:

आम्‍ही आपली वैयक्तिक माहिती खाजगी आणि सुरक्षित ठेवतो — आणि आपल्‍याला नियंत्रणात ठेवतो.

आपल्या गोपनीयता आणि सुरक्षेबाबत आमच्या वचनबद्धतांविषयी अधिक जाणून घ्या.