राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दोन्ही युवा नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आदित्य याचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही प्रसिद्ध संस्थांच्या मजी विद्यार्थ्यांनी करोना व्हायरस या महामारीविरोधात लोकांसाठी सरकारसोबत काम करण्याची इच्छा रोहित पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. रोहित पवार यांनी तात्काळ मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे हा निरोप पोहचवला. आदित्य ठाकरे यांनीही गांभीर्य ओळखून तासभरात रोहित पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. या सर्व घडामोडी वेगानं घडल्यामुळे रोहित पवार यांना आदित्य ठाकरे आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचं कौतुक वाटलं म्हणून ट्विट करत ते म्हमाले की, कोणताही प्रश्न तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न अनेक मंत्री करतात,हे याचं जिवंत उदा.आहे.

रोहित पवार यांनी मागितली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मदत

अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगुन दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत. त्यांच्या अडचणी समजताच आमदार रोहित पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मदत करण्याची विनंती केली आहे. “दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी अडकले आहेत. करोल बाग, मुखर्जी नगर, हैदरपूर या भागात हे विद्यार्थी असून त्यांना जेवणासह जीवनावश्यक वस्तुंसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांश विद्यार्थी समाजातील मागासलेल्या घटकातील असून, त्यांना सर्व सोयी देण्याची व्यवस्था करण्यात यावी,” अशी विनंती रोहित पवार यांनी अरविंद केजरीवाल यांना केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar appreciate aaditya thackeray for hard working nck
First published on: 26-04-2020 at 13:08 IST