एक्स्प्लोर

पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी, 37 लाख 84 हजार रुपयांचे साहित्य लंपास

पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात लॉकडाऊनदरम्यान चोरी झाल्याचं उघड झालं आहे. यामध्ये 37 लाख 84 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेलं आहे.

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी जवळच्या पांगरी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या चोरी प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. त्यानंतर कोरोनोमुळे लॉकडाऊन झाले आणि याच दरम्यान वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चोरी झाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला चोरी झाली होती. त्याची माहिती स्टोअर कीपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं.

चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखर कारखाना प्रशासनाकडून तपास सुरु होता. नेमके कोणकोणते साहित्य चोरीला गेली याची माहिती मिळवणे सुरु होते.

साखर कारखान्यातून काय काय चोरीला गेले?

- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातून जी चोरी झाली आहे त्यामध्ये बऱ्याच मोठ्या वस्तू होत्या. कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे.

- 24 तास साखर कारखान्यावर सुरक्षारक्षक नेमलेले असतानाही ही नेमकी चोरी कशी झाली? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र साखर कारखाना बंद असल्याचा फायदा घेऊन एवढी मोठी चोरी घडली कशी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बजरंग बलवान...  पंकजांविरुद्धचा उमेदवार संपत्तीतही तगडा ; कारखानदार सोनवणेंची संपत्ती किती?
बजरंग बलवान... पंकजांविरुद्धचा उमेदवार संपत्तीतही तगडा ; कारखानदार सोनवणेंची संपत्ती किती?
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव; वैभव नाईकांची राणेंवर टीका
मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव; वैभव नाईकांची राणेंवर टीका
Raigad Lok Sabha : रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Shirsat :   महायुतीच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांची जीभ घसरलीVinod Patil Exclusive : मी कुठलाही बालहट्ट करत नाहीये; ही निवडणूक विकासाठी लढवायची आहे - विनोद पाटीलChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 2 PM :  23 एप्रिल 2024 : ABP MajhaWashim Loksabha Election :वाशिमच्या जिल्हाधिकारी मतदार रॅलीत सहभागी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बजरंग बलवान...  पंकजांविरुद्धचा उमेदवार संपत्तीतही तगडा ; कारखानदार सोनवणेंची संपत्ती किती?
बजरंग बलवान... पंकजांविरुद्धचा उमेदवार संपत्तीतही तगडा ; कारखानदार सोनवणेंची संपत्ती किती?
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव; वैभव नाईकांची राणेंवर टीका
मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव; वैभव नाईकांची राणेंवर टीका
Raigad Lok Sabha : रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
IPL 2024 Hardik Pandya Video: हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
Tutari Symbol: निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
Nashik Lok Sabha : हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? छगन भुजबळ हसत हसत म्हणतात, 'त्यांनी गोड बातमी द्यावी'
हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? छगन भुजबळ हसत हसत म्हणतात, 'त्यांनी गोड बातमी द्यावी'
Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश
Embed widget